खरीप २०२४ पिक विमा भरताना यावर्षीनवीन नियम आला आहे. यात समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड , बँक पासबुक व सातबारा वर नाव एक सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे. किंवा नावात बदल आहे .
उदा. राम - रामराव/ रामनाथ/ रामभाऊ , बाळासाहेब -- बालासाहेब - बाळू, सुमन - सुमनबाई , जगू - जगन्नथ , जनार्दन - जनार्धन , ज्ञानदेव- ज्ञानेश्वर- , सुदाम -सुधाकर, सरुबाई-सरस्वती,महादू - महादेव, लैला -लीला . रौफ- रऊफ , कासिम - काशिम , बाबू - बाबुराव / बाबासाहेब, असे अनेक उदाहरण आहेत. ज्या मुळे सातबारा व आधार कार्ड नावे लिंक होत नाहीत काही शेतकऱ्यांच्या साताबरा वरती वडिलाचे व आडनाव नाहीत किंवा फक्त आडनाव नाव आहे , त्यांनी आपले जसे आधार कार्ड वरती व बँक पासबुक वरती नाव आहे, तसे नाव दुरुस्थ करावे घेणे.
शेतकऱ्यांचे आधार कार्ड पासबुक व सातबारा वर स्वतःचे नाव किंवा वडीलाचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण, या सर्वांमध्ये जर सारखी माहिती असेल तरच विम्या चे फॉर्म अप्रुव्हल होनार नाही आहेत .तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये वीमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकनार नाहीत.
कारण अगोदर तुम्हास विमा येत होता. ह्याच नावावर किंवा ह्याच आधारवर ह्याच बँक पासबुक वर विमा जमा होत होता , पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व माहिती सारखी असेल तरच विमा जमा होत आहे ,जर माहिती मध्ये काही चूक असेल तर तुमचे फॉर्म अप्रुव्हल होनार नाही. त्यामुळे आपणास मोठे नुकसान होऊ शेकते .
तरी शेतकर्यांनी नावात लवकर दुरुस्थी करून घ्यावी. पिक विमा भरावा .