भारतात जगातील सर्वात जास्त पाळीव प्राण्याची संख्या आहे, आणि भारत जगातील सर्वात जास्त दुध उत्पादक देश आहे. भारत सरकारने पाळीव प्राण्याची संख्या मोजण्यासाठी व प्राण्याची माहिती साठवण्यासाठी INAPH द्वारे प्राण्यांना टॅगिंग करून विशिष्ट बारा अंकी नंबर दिला जातो, तो नंबर म्हणजे पशु अशार कार्ड (UID) Pashu Aadhar होय. पशु आधार कार्ड गाय/ म्हैस/ शेळी / व इतर पाळीव प्राणी दिले जाते, त्या मध्ये त्या प्राण्याची (पशु) माहिती डिजिटल digital रुपात साठवली जाते. आता पर्यंत २२ कोटी गाय व म्हैस चा आधार नंबर दिला गेला आहे.
गाय व म्हैस चे आधार कार्ड हे
INAPH (Information Network of Animal Productivity And Health-INAPH) कडून पशु
आधार बनवले जात आहे.
त्यासाठी गाय व म्हैस यांना INAPH हे एक विशिष्ट क्रमांक देत
आहे व ते गाय व म्हैस यांना टॅगिंग केले जाते
त्यामुळे प्राणी विकास कार्यक्रमस चालेना मिळेल व गाय / म्हैस आजार , लसीकरण, कृत्रिम रेतन, पशु खाद्य,
प्राण्याची जात, वंशवळ बद्दल माहिती ,पशु पालन साठी विविध योजनाचा प्रसार करता
येत, विविध रोगा वरील लसीकरण विषय माहिती साठवली जाते व त्या प्राण्याच्या आरोग्य
विषयक माहिती जतन व ऑनलाईन केली जाते, हि माहिती शेतकरी तथा पशु वैदकीय डॉक्टर व
सरकारी सर्वेक्षण साठी उपलब्ध करून दिली जाते.
सरकारी विविध योजनेंचा लाभ मिळवणे साठी पशु आधार काढणे व ते शेतकरी
आधारला लिंक करणे गरजेचे आहे.
पशु आधार कसे काढावे ? (How to Make Pashu Aadhar?)
पशु आधार हे जवळील सरकारी वैद्यकीय दवखान्यात तयार करून दिले जाते,
साठी डॉक्टर ई गोपाल (E-Gopala App )मध्ये नोंदणी करून, गाय व म्हैस यांना टॅगिंग
करून त्यावर १२ अंकी नंबर दिला जातो त्यास पशु आधार म्हणून वापरले जाते.
ई गोपाल (E-Gopala App ) app चा वापर करून शेतकरी आपल्या गाय म्हैस
यांची माहिती मिळवता येते, तसेच गायचे लसीकरण कधी झाले, गाईच वय काय?, रंग कोणता?,
गाय दुध किती देते, गाईचे किती वीत झाले, तसेचगायीची गर्भ धारणा कधी झाली हि सर्व
माहिती यामध्ये जोडता येते, आपल्या माहिती लागल्यास पुन्हा मिळवता येते. यातून त्या
गाईची इतिहास (histry) कळते.
शेतकर्यांनी आपल्या गाय साठी पशु आधार काढून घेणे गरजेचे आहे. यातून
शेतकर्यांना गाय व म्हैस संगोपन करणे सोपे होईल.