०८ जानेवारी, २०२४

कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत शेतकरी यादी - 2023 जाहीर / Maha-DBT Online Lottery farmer List-2023 of Various Schemes in Agriculture Department

कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत शेतकरी यादी -2023 Maha-DBT Online Lottery farmer List -2023 of Various Schemes in Agriculture Department जाहीर झाली आहे.

Mahadbt-Lottery Farmer List

निवड झालेल्या शेतकर्यांनी आपली ज्या योजने साठी निवड झाली आहे त्या योजनेची कागदपत्रे वेळेत अपलोड करणे गरजेचे आहे. नाहीतर निवड झालेली रद्द होईल, तरी  ज्यांना कागद पत्रे अपलोड करण्यासाठी SMS आले असेल त्यांनी कागदपत्रे पोर्टल वरती उपलोड करून त्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे. आपण हे कागदपत्रे महा-डी .बी. टी Maha-DBT   https://mahadbt.maharashtra.gov.in/ )  या  पोर्टल वर अपलोड करावे. कृषी विभागाच्या विविध योजने  जसकि  कांदा चाळ , कृषी औजारे  - रोटा , नांगर  , रेजर , मळणी यंत्र, फवारणी यंत्र , लागवड यंत्र पेरणी यंत्र इ किंवा इतर शेती उपयोगी ट्रक्टर चालीत औजारे व याचं बरोबर शेडनेट , पॅलीहॅउस , मल्चिंग पेपर , शेततळे , शेततळे अस्तरीकरण टिबक सिंचन , तुषार सिंचन , विहीर खोद काम , पंपसेट , पाईप लाईन , डाळ मिल, सोलर ड्रायर , धान्य साठवण ,कृषी औजार बँक  या साठी प्रत्येक योजने साठी वेगळी कागद पत्रे आहेत, तसेच नकाशे , उतारे, कोटेशन, टेस्ट रिपोर्ट ,अंदाज पत्र  Estimate इ. माहिती योग्य रित्या भरावी.

 
कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत शेतकरी यादी नाव असणाऱ्या शेतकर्यांनी पुढील कागदपत्रे अपलोड करावे 
१ . ७/१२  उतारा 
२. ८ अ उतारा
३. बँक पासबुक
४. कोटेशेन (Quotation) 
५. टेस्ट रिपोर्ट 
६.आधार कार्ड 
७. डी पी आर ( योजने नुसार)
८. समाहित पत्र ( सामाईक क्षेत्र असेल तर )
९. इतर कागद पत्रे जे योजने नुसार पूर्तता करावी
१० . अपंग दाखला (दिव्यांग प्रमाणपत्र )  UDID  (अपंग असल्यास )
११. जातीचा दाखला (आवशक असल्यास )
१२. उत्पन्न दाखला आवशकअसल्यास )
१३. RC बुक   आवशक असल्यास )Lottery List of farmer 

१८ डिसेंबर २०२३ रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन  शेतकरी सोडत ( Lottery List of  farmer)  यादी  

        *👉 १८/१२/२०२३ यादी 


२९ डिसेंबर २०२३ रोजी झाले कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन शेतकरी सोडत  (Lottery List of farmer)  यादी

        *👉 २९/१२/२०२३ यादी 


ज्या शेतकर्यांनी कागद पत्रे अपलोड केली आहेत . आशा शेतकर्यांना पूर्व संमती आली असेल तर ती वस्तू खरेदी करावी व बिल व संबधित कागद पत्रे उपलोड करावे, ज्यांना पूर्व संमती आली नसेल तर त्यांनी उर्वरित किवां काही त्रुटी आले असेलतर त्यांची पूर्तता करावी, त्रुटी पूर्तता झाल्या नंतर आपणास पूर्व संमती मिळेल. पूर्व समंती आल्या अंतर ज्या कामासाठी पूर्व संमती आली आहे. तीच वस्तू खरेदी करावी  किंवा ज्या योजने साठी पूर्व संमती आली आहे . त्या योजण्याच्या लाभ साठी ज्या आटीशर्ती पूर्ण करून बांधकाम करावे, वस्तू उभी करावी , तसेच त्या सर्वांचे GST बिल आपल्या कडे ठेवावे व ते उपलोड करावे, पूर्व संमती आल्या तारखीपासून १ महिन्याच्या आत मंजुरी ( योजने) नुसार काम पूर्ण करून आपले बिल उपलोड करावे.
कृषि विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत यादीतील शेतकरी यांनी बिल उपलोड करण्यासाठी
  महा डीबीटी MahaDBT वर  farmer Login (शेतकरी वापरकर्ता ) येथे आपले user id व पासवर्ड  टाकून प्रवेश करावे व कागद पत्रे  या सादर आपले बिल रक्कम  व  GST नंबर टाकून बिल उपलोड करावे .

कागदपत्र उपलोड करण्यासाठी पुढील लिंक काचा वापर करावा:-
                                       https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

बिल उपलोड केल्या नंतर मोका तपासणी झाल्या नंतर १ महिन्यात अनुदान शेतकऱ्याच्या खातात जमा होईल .

शेतकर्यांनी विविध योजने साठी अर्ज करण्यासाठी महा डीबीटी पोर्टलचा  https://mahadbt.maharashtra.gov.in/  वापर करावा व महाराष्ट्र शासनाच्या योजनाचा लाभ मिळावा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Amazon Business

Amazon Business
Up to 40% Off

लोकप्रिय पोस्ट