मेन्यू

दिव्यांग (Handicap) योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिव्यांग (Handicap) योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०६ डिसेंबर, २०२३

दिव्यांग (अपंग ) व्यक्तींना हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत वाटप योजना

 महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी

मोफत ई व्हेईकल

    राज्यातील  दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) Free E-Vehicle मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल https://evehicleform.mshfdc.co.in यावर  दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त अपंग व्यक्ती यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासन यांनी आव्हान केले आहे    

अधिक माहितीसाठी हेल्प लाईन क्रमांक: +918035742016

योजनेच्या अटी व शर्ती

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे    तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा/ 3.अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  •  अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
  • मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील ६. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे
  • लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा  परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort)सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल
  • अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे
  • जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल, अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा. 
  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा.

Amazon Business

Amazon Business
Up to 40% Off

लोकप्रिय पोस्ट