१४ नोव्हेंबर, २०२३

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन (MAHABMS) यांच्या सन २०२३-२४ करिता ऑनलाईन अर्ज करा.

 गाई/म्हैस , शेळी /मेंढी, कोंबडी वाटप पशुसंवर्धन  विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नाविन्य पूर्ण  योजना व जिल्हास्तरीय  योजना या अंतर्गत सन २०२३ -२४  या वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ०९/११/२०२३ पासून ०८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन  www.ah.mahabms.com या संकेतस्थळ  वरती अर्ज मागवण्यात आले आहे. 




पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन  यांची कडून शेळी, गाय , कोबडी वाटप करण्यात येणार असून  नाविन्य पूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ,महिला बचत गट , अल्प भू-धारक शेतकरी,  सुशिक्षित बेरोजगार , दारिद्र्य रेषेखालील  यादीतील लाभार्ती यांना आव्हान करण्यात आले आहे.  सन २०२३ -२४  या वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ०९/११/२०२३ पासून ०८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन  www.ah.mahabms.com या  संकेतस्थळ  वरती अर्ज करण्यात येणार असून अर्ज तसेच AH-MAHABMS  हे मोबाईल एप्लीकेशन उपलब्ध असून अचूक माहिती भरून आपला अर्ज पूर्ण करावा . अर्ज प्राधान्य कामाने निवड करण्यात येणार असून दारिद्र्य रेषेखालील,  महिला बचत गट ,अत्यल्प भू-धारक शेतकरी, अल्प भू-धारक शेतकरी, अपंग व्यक्ती ,सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती - जमाती  यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सन २०२१-२२ यावर्षी अर्ज केल्याल्या लाभार्थाची प्रतीक्षा यादी २०२५ -२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. सन २०२२ -२३ मधील अर्जदार लाभार्थी देण्यात येणारा लाभ यादीतील ज्येष्ठता क्रमांक व उपलब्ध निधी नुसार करण्यात येणार आहे 
गाई/म्हैस , शेळी /मेंढी, कोंबडी वाटप योजना  अर्ज करण्यासाठी येथे किलिक करा -👇🏼https://ah.mahabms.com/webui/registration

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्रअथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड /कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय -जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

योजनाचे नाव -

१. राज्यस्तरीय योजना -.

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .

संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी

देशी गाय – गीरसाहिवालरेड सिंधीराठीथारपारकर देवनीलाल कंधारीगवळाऊ व डांगी.

योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

योजनेचे नाव - 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे


२. जिल्हास्तरीय योजना -

योजनेचे नाव - १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे.

योजनेचे नाव - ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.

योजनेचे नाव - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

Amazon Business

Amazon Business
Up to 40% Off

लोकप्रिय पोस्ट