नोकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नोकरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ नोव्हेंबर, २०२३

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन (MAHABMS) यांच्या सन २०२३-२४ करिता ऑनलाईन अर्ज करा.

 गाई/म्हैस , शेळी /मेंढी, कोंबडी वाटप पशुसंवर्धन  विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नाविन्य पूर्ण  योजना व जिल्हास्तरीय  योजना या अंतर्गत सन २०२३ -२४  या वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ०९/११/२०२३ पासून ०८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन  www.ah.mahabms.com या संकेतस्थळ  वरती अर्ज मागवण्यात आले आहे. 




पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन  यांची कडून शेळी, गाय , कोबडी वाटप करण्यात येणार असून  नाविन्य पूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ,महिला बचत गट , अल्प भू-धारक शेतकरी,  सुशिक्षित बेरोजगार , दारिद्र्य रेषेखालील  यादीतील लाभार्ती यांना आव्हान करण्यात आले आहे.  सन २०२३ -२४  या वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ०९/११/२०२३ पासून ०८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन  www.ah.mahabms.com या  संकेतस्थळ  वरती अर्ज करण्यात येणार असून अर्ज तसेच AH-MAHABMS  हे मोबाईल एप्लीकेशन उपलब्ध असून अचूक माहिती भरून आपला अर्ज पूर्ण करावा . अर्ज प्राधान्य कामाने निवड करण्यात येणार असून दारिद्र्य रेषेखालील,  महिला बचत गट ,अत्यल्प भू-धारक शेतकरी, अल्प भू-धारक शेतकरी, अपंग व्यक्ती ,सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती - जमाती  यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सन २०२१-२२ यावर्षी अर्ज केल्याल्या लाभार्थाची प्रतीक्षा यादी २०२५ -२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. सन २०२२ -२३ मधील अर्जदार लाभार्थी देण्यात येणारा लाभ यादीतील ज्येष्ठता क्रमांक व उपलब्ध निधी नुसार करण्यात येणार आहे 
गाई/म्हैस , शेळी /मेंढी, कोंबडी वाटप योजना  अर्ज करण्यासाठी येथे किलिक करा -👇🏼https://ah.mahabms.com/webui/registration

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्रअथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड /कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय -जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

योजनाचे नाव -

१. राज्यस्तरीय योजना -.

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .

संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी

देशी गाय – गीरसाहिवालरेड सिंधीराठीथारपारकर देवनीलाल कंधारीगवळाऊ व डांगी.

योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

योजनेचे नाव - 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे


२. जिल्हास्तरीय योजना -

योजनेचे नाव - १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे.

योजनेचे नाव - ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.

योजनेचे नाव - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

०१ ऑक्टोबर, २०२३

भारत सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ( PM - SYM) योजनेत नोंदणी करा वयाच्या ६० वर्ष नंतर दर महिना ३००० पेन्शन मिळवा



भारत सरकार तर्फे (केंद्र सरकार )प्रधान मंत्री श्रम योगी मानधन PM-SYM मध्ये स्वत: व्यवसाय करणारे, मजूर , अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तसेच असंघटीत कामगार यांना वृध्प काळत ( वयाच्या ६० वर्ष नंतर ) पेन्शन  मिळावी  या उद्देशाने हि योजना सुरु केली आहे. 
       
           

PM-SYM प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  या योजनेत सहभागी होण्यासाठी शर्त पुढील प्रमाणे

१. वर्ष १८ ते ४० वर्ष वय असणे गरजेचे आहे. 

२. महिना १५००० रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणारे 

३.असंघटीत कामगार - स्वयं -रोजगार असणारी व्यक्ती खाजणी ठिकाणी काम करणारे मजूर, छोटे व्यावसायिक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, न्हावी, सुतार , गवंडी, लोहार, चांभार, शिंपी, हॉटेल चालक , हॉटेल कामगार,  सोनार  इतर पारंपारिक व्यवसाय करणारे कारागीर यात सहभागी होऊ शकतात .

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM-SYM  या योजनेत पत्र नसणारे  पुढील प्रमाणे 

१. करदाता (Income Tax) व्यक्ती,
२. संस्थे मधील पगारदर नोकर EPF /NPS/ ESIC सहभागी व्यक्ती.
३. सरकारी नोकरदार 
 
प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM-SYM योजनेत सहभाग घेण्यासाठी स्वत ऑनलाईन नोंदणी  करता येते  https://maandhan.in   तसेच जवळच्या आपले सरकार केंद्र, सि एस सी सेंटर किंवा महा ई सेवा केंद्र नोंदणी करता येते.

वय नुसार हप्ता हा कमी जास्त राहील जस कि रामच वय १८ वर्ष आहे त्यास ५५ रु दरमहा हप्ता असेल. जर रामचे वय हे २९ असेल तर त्यास १०० रुपये हप्ता असेल त्या प्रमाणात केंद्र सरकार त्यांचा हप्ता जमा करेल.

महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकी योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किमंतीच्या 50 टक्क्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 1.25 लाख खरेदीसाठी अनुदान दिले जाते


प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM - SYM या योजनेत सहभागी होणाऱ्या साठी दरमहा आपल्या वया नुसार हप्ता वयाच्या ६० वर्ष पर्यंत भरावा लागतो, त्या प्रमाणात सरकार सुद्धा हप्ता भरते , उदा. अनिल चे वय ४० आहे त्याचा दरमहा हप्ता २०० असेल तर सरकार २०० जादा रक्कम टाकून अनिल चा हप्ता ४०० जमा होतो असे वयाच्या ६० वर्ष पर्यंत हप्ता भरला तर ६० वर्ष नंतर अनिल ३००० महिना पेन्शन मुर्त्यू पर्यंत सुरु राहील . तसेच वारसा पत्नी  सुद्धा त्याचा लाभ होईल . जर अनिल ला योजनेतून बाहेर पडायची असेल तरी त्याने भरलेले हप्ते व व्याज परत मिळते 

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM - SYM योजनेत लाभार्थी जर वय ६०नंतर  मुर्त्यू झाल्यास जोडीदारास (पती/पत्नी ) यांस  अर्धी पेन्शन सुरु होईल

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन  PM - SYM योजनेचे कमी रकमेत जास्त पेन्शन मिळते हियोजना LIC व भारत सरकार रोजगार मंत्रालय यांच्या संयुक्त पणे चालवली जाते.

योजनेत सहभाग साठी खालील कागद पत्र लागतात 
१. आधार कार्ड 
२. पॅन कार्ड 
३. बँक पासबुक 
४. वारसाचे नाव 
५. सही 
६. मोबाईल नंबर 





१९ सप्टेंबर, २०२३

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध १०९८९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढ ..



महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध १०९८९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाही. किंवा अर्ज करण्यास उशीर झाला व फी भारता आली नाही अशा सर्व साठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी .

 अर्ज फी  ➩➩➩➩  SC एस सी  / ST एस टी / OBC ओबीसी / EWS ई डब्लू एस /PWD                                                 पि डब्लू डी  साठी रु -९००

                                    GENERAL सर्वसाधारण - रु - १०००

                                    माजी सैनिक साठी फी नाही.

वय  ➩➩➩➩   १८ सप्टेंबर २०२३  रोजी  १८ ते ४० वर्ष असावे 

                                  ( ५ वर्ष  SC व ST  साठी तर OBC साठी ३ वर्ष वयात सूट )

अर्ज करण्याची शेवटची तारीख ➩➩22 सप्टेंबर २०२३

शैक्षणिक पात्रता➩➩   शैक्षणिक पात्रते साठी  मूळ जाहिरात बघावी नंतर अर्ज करावा. . 


जाहिरात येथे पहा    ➩➩➩➩ आरोग्य विभाग 

                                                                          ग्रुप C    ग्रुप D

ऑनलाईन अर्ज येथे करा  ➩➩➩➩ आरोग्य विभाग अर्ज 

अधिकृत वेबसाईट  ➩➩➩➩ http://arogya.maharashtra.gov.in/


सविस्तर  माहितीसाठी  मूळ जाहिरात बघावी नंतर अर्ज करावा.


भारतीय स्टेट बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसर ( SBI PO) पदांच्या एकूण २००० जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु




भारतीय स्टेट बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण २००० जगण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून  अर्ज करण्याची सुरुवात ७ सप्टेंबर २०२३ पासून ते २७ सप्टेंबर २०२३ आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत अर्ज कोणत्याही विद्या शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतात . एस सी - साठी ३०० जागा , एस टी  साठी - १५० जागा, ओबीसी साठी - ५४०, ई डब्लू एस साठी - २०० व सर्वसाधारण साठी ८१० अशा एकूण २००० जागा साठी उपलब्ध आहेत .

अर्ज फी  ➩➩➩➩  SC / ST /PWD  साठी फी नाही 

                                     OBC / GENERAL/ EWS - रु - ७५० रुपये 

वय  ➩➩➩➩   २० ते ३० १ एप्रिल २०२३  पर्यंत

                                  ( ५ वर्ष  SC व ST  साठी तर OBC साठी ३ वर्ष वयात सूट )

अर्ज करण्याची शेवटची तारीख ➩➩२७ सप्टेंबर २०२३

शैक्षणिक पात्रता➩➩   कोणत्याही विद्या शाखेचा पद्विदार किंवा  पदवीच्या शेवटच्या                                                     वर्षात(सेमिस्टर ) मध्ये शिकत असल्यास अर्ज करू शकतात . 


जाहिरात येथे पहा    ➩➩➩➩SBI Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज येथे करा  ➩➩➩➩ SBI  Recruitment 2023 Apply

अधिकृत वेबसाईट  ➩➩➩➩ sbi.co.in


सविस्तर  माहितीसाठी  मूळ जाहिरात बघावी नंतर अर्ज करावा.


२८ एप्रिल, २०२३

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या २२० जागा आजच अर्ज करा

 बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या २२० जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागिविण्यात आले असून कोणत्याही शाखेचा पदवीधर  अर्ज करून शकतो, विविध पदासाठी अनुभवी उमेदवाराची आवश्यकता असून पदासाठी  योग्य त्या  अनुभवी उमेदवारांनी अर्ज मागीवण्यात आले आहे.
पदाची संख्या , वयाची अट , अनुभव  व पद संख्या पुढील प्रमाणे 

नं

पदाचे नाव

शिक्षिक पात्रता

वय

वर्ष  

अनुभव वर्ष

पद संख्या

विभागीय विक्री व्यवस्थापक व्यवसाय

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही शाखेचा पदवीधर /

प्राधन्य पदव्युत्तर शिक्षण / पदविका

/ पदविका

 

 

 

 

 

३३ ते ४८ वर्ष

 

 

 

 

 

 

 

 

१२ वर्ष

विभागीय विक्री व्यवस्थापक  MSME असुरक्षित व्यवसाय

विभागीय विक्री व्यवस्थापक MSME  CV /CME

विभागीय विक्री व्यवस्थापक (ट्रक्टर कर्ज ) 

२८ ते ४५  वर्ष

 

 

 

 

 

 

 

८ वर्ष

 

 

सहाय्यक उपाध्यक्ष MSME विक्री

 

 

 

२८ ते ४०   वर्ष

 

४०

सहाय्यक उपाध्यक्ष msme विक्री LAP/  असुरक्षित व्यवसाय

सहाय्यक उपाध्यक्ष विक्री MSME  CV /CME

वरिष्ठ व्यवस्थापक MSME  विक्री

 

 

 

 

२५ ते ३७    वर्ष

 

 

 

 

 

५ वर्ष

 

५०

वरिष्ठ व्यवस्थापक msme विक्री LAP/  असुरक्षित व्यवसाय

१५  

१०

वरिष्ठ व्यवस्थापक MSME विक्री  CV /CME

30

११

वरिष्ठ व्यवस्थापक msme विक्री विदेश मुद्रा (निर्यात /आयात व्यवसाय)

१५  

१२

व्यवस्थापक MSME  विक्री

२२  ते ३७    वर्ष

२ वर्ष

४०                                   


भाभा अणु संशोधन केंद्रात ४३७४ पदासाठी भरती आजच अर्ज करा

👉 वय पात्रता-  सूट ओ बी सी साठी ३ वर्ष व एस सी / एस टी साठी ५ वर्ष शिथिल                 करण्यात आले आहे.

👉       ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११  मे २०२३ ला ११ .५९ रात्री वाजेपर्यंत 

👉   परीक्षा शुल्क – सर्वसाधारण (General ) व ओ बी सी(OBC)  ६००  रुपये  

               एस सी (SC) / एस टी (ST) साठी/ महिला/ अपंग यांना १०० रुपये   


👉  जाहिरात पहा :संपूर्ण जाहिरात पहा 

👉  अधिकृत वेबसाईट:- Bank of Baroda

👉  ऑनलाईन अर्ज करण्याशाठी येथे लिंक: -अर्ज करा 


👉अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop सामील होण्यासाठी  पुढील लिंक चा वापर करा  

👉  येथे किलिक करा  सामील होण्यासाठी 👈☎

२५ एप्रिल, २०२३

भाभा अणु संशोधन केंद्रात ४३७४ पदासाठी भरती आजच अर्ज करा

 

    भारत सरकारचे भाभा अणु संशोधन केंद्र हे भारतातील प्रमुख अणु संशोधन केंद्र आहे ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. भाभा अणु संशोधन केंद्र त विविध पद भारती साठी अर्ज करण्यसाठी जाहिरात आली असून या पुढील प्रमाणे पदे भरली जाणार आहे. BARC भर्ती 2023 साठी एकूण 4374 पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे.    

 १२६१ पदासाठी  एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा- 2023 (UPSC - 2023) आजच अर्ज करा 

 ते पदे  तांत्रिक अधिकारी/C, वैज्ञानिक सहाय्यक/B, तंत्रज्ञ/B, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I), आणि स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. मग आजच ऑनलाईन अर्ज करावा

अ.   नं.

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

पद संख्या

वय पात्रता २२ मे २०२३ रोजी

तांत्रिक अधिकारी / क गट

६०%गुणांसह एम एस सी (M. Sc) किंवा बी ई / बी टेक किंवा ५५% गुणासह M. Lib ४ वर्ष अनुभव   

१८१

१८ ते ३५ वर्ष

वैज्ञानिक सहाय्यक/ ब गट

६०%गुणांसह बी एस सी (B. Sc)

०७

१८ ते 30 वर्ष

तंत्रज्ञ/ब गट

१० वी पास व बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र धारक  

२४

१८ ते २५ वर्ष

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)

६०%गुणांसह बी एस सी (B. Sc) किंवा इंजिनेरिंग डिप्लोमा

१२१६

१८ ते २४ वर्ष

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)

६०%गुणांसह १० वी पास  व ITI, किंवा ६० % गुणासह १२ वी विज्ञान व डेंटल टेक्नीशियन डिप्लोमा पास

२९४६

१८ ते २२ वर्ष

     टीप -  शैक्षणिक पात्रते साठी  व पदाचे विस्तारित माहिती साठी मूळ जाहिरात पहावी 

वय पात्रता- सूट ओ बी सी साठी ३ वर्ष व एस सी / एस टी साठी ५ वर्ष शिथिल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य  कृषी विभगात २१८ पदासाठी भारती मुदत वाढ 30 एप्रिल २०२३ पर्यंत 

अर्ज शुल्क पुढील प्रमाणे -

अ.नं

पदाचे नाव

प्रवर्गनुसार फी

सर्व साधारण

ओ बी सी

एस सी

एस टी

अपंग

महिला

तांत्रिक अधिकारी / क गट

५०० रु

५०० रु

फी नाही

फी नाही

फी नाही

फी नाही

वैज्ञानिक सहाय्यक/ ब गट

१५० रु

१५० रु

तंत्रज्ञ/ब गट

१०० रु

१०० रु

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)

१५० रु

१५० रु

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)

१०० रु

१०० रु

 

जाहिरात पहा :- संपूर्ण जाहिरात पहा 

अधिकृत वेबसाईट:- BARC

ऑनलाईन अर्ज करण्याशाठी येथे लिंक: -अर्ज करा 

 👉अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop सामील होण्यासाठी  पुढील लिंक चा वापर करा  

👉  येथे किलिक करा  सामील होण्यासाठी 👈☎

        पॅन आधार लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ

Amazon Business

Amazon Business
Up to 40% Off

लोकप्रिय पोस्ट