भारत
सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने PMFBY प्रधानमंत्री पिक विमा
योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम
२०२२ व रब्बी हंगाम २०२२-२३ करिता Cup & Cap Model (८०:११०) नुसार राबविण्यात आली होती. केंद्र शासनाने संदर्भ क्र. ४ अन्वये Cup & Cap Model (८०:११०), Cup & Cap Model (६०: १३०) Profit & Loss Sharing Model यापैकी एका मॉडेलनुसार योजनेची
अंमलबजावणी करणेकरीता मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील
अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम
२०२५-२६ हंगामासाठी तीन वर्षांकरीता राज्यात केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ४ च्या
पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार तसेच संदर्भ क्र ५ अन्वये राज्यात प्रधानमंत्री
पीक विमा योजना Cup &
Cap Model (८०:११०)
नुसार खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित
पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ३ वर्षांसाठी निवड करण्यात
आलेली आहे
योजनेची उद्दीष्टये :
PMFBY अंतर्गत
नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या प्रतिकूल
परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण मिळेल. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत ही शेतक-यांचे आर्थिक परिथिती चांगली राहील. शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व
सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि-क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य
राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून
शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे
विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य
होण्यास मदत होईल.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
· सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल.
· प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
· शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड)भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
· या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. त २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय संदर्भ क्र. ६ अन्वये घेण्या असून शेतक-यांना प्रती अर्ज केवळ १/- रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रू.१/- वजा जाता उर्वरीत फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान (Rate of normal premiurn subsidy) समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.
· अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे
· या योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या तीन वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी
· जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
· अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. उंबरठा उत्पादन हे तीन वर्ष कालावधीकरिता निश्चित असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या तीन वर्ष कालावधी करिता कायम असेल.
· सदरची योजना ही एकूण १२ जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पिक विमा कंपन्यांमार्फत तीन वर्षाकरीता
· राबविण्यात येईल. विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पर्यंतचे दायित्व स्वीकारतील. तथापि, एका वर्षांतील देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पेक्षा जास्त असल्यास ११० टक्के पेक्षा जास्तीचा भार राज्य शासन विकारेल आणि जर देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवेल व उर्वरीत विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला परत करेल.
· या योजनेत मृत शेतक-यांच्या नावे विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येईल.
· जोखमीच्या बाबी योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
· हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
· पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,
· चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे
· नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान.
· हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट.
· स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
पिक विमा करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा
एक रुपयात पिक विमा- प्रधान मंत्री फसल बिमा योजना (PMFBY) या अंतर्गत योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्यासाठी ३१जुलै २०२३ पर्यंत मुदत
योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी
:
या
योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत
धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजना राज्यात शासनाने खरीप व
रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसुल मंडळ/मंडळगट किंवा तालुकास्तरावर खालील
अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल.
पिक वर्गवारी |
खरीप
हंगाम |
रबी
हंगाम |
नगदी पिके |
कापुस, खरीप
कांदा |
रब्बी कांदा. |
तृणधान्य व कडधान्य पिके |
भात (धान), खरीप
ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), गुग, उडीद, तुर, मका |
गहू (बागायत), रबी
ज्वारी (बागायत जिरायत) हरभरा, उन्हाळी भात |
गळीत धान्य पिके |
भुईमुग, कारळे, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन |
उन्हाळी
भुईमुग |
बिगर कर्जदार शेतकरी पिक विमा नोदंणी
करण्याचे ठिकाण :
Ø बँकेत, सेतू केंद्र , आपले सरकार केंद्र, स्वत: शेतकरी https://pmfby.gov.in या
पोर्टल वर आपला पिक विमा भरू शकता
कर्जदार शेतकरी पिक विमा नोदंणी करण्याचे
ठिकाण:
Ø ज्या बँकेत कर्ज घेतले असेल त्या बँकेत आपण पिक
विमा जमा करता येतो.
विमा भरणे शुल्क/हप्ता:
Ø १ रु
फक्त
लागणारे कागदपत्रे:
Ø पिक पेरा
Ø सात बारा आठ अ (७/१२ , ८अ )
Ø बँक पासबुक / चेक
Ø आधार कार्ड
Ø सामाईक जमीन असल्यास नाहरकत पत्र
Ø भाडोत्री असल्यास भाडेकरार पत्र
पी एम किसान सम्मान निधी (PM KISAN ) योजनेचा वितरीत होणाऱ्या १४ व्या हप्तासाठी ई - केवायसी (E -kyc ) करणे गरजेच
अ. न |
विमा
कंपनी |
जिल्हा
|
१ |
ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.. |
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा |
२ |
आयसीआयसीआय
लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. |
परभणी, वर्धा, नागपूर |
३ |
युनिव्हर्सल
सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि |
जालना, गोंदिया, कोल्हापूर |
४ |
युनायटेड
इंडिया इंन्शुरन्स कं. लि. |
नांदेड, ठाणे, रत्नागिरी.
सिंधुदुर्ग |
५ |
चोलामंडलम एम
एस जनरल इन्शुरन्स कं. लि. |
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड |
६ |
एचडीएफसी
इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि |
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे,
उस्मानाबाद |
७ |
रिलायन्स जनरल
इन्शुरन्स कं. लि |
यवतमाळ, अमरावती, गडचिरोली |
८ |
भारतीय कषि
विमा कंपनी |
वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार,
बीड |
९ |
एसबीआय जनरल
इन्शुरन्स कं. लि. |
लातूर |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा